Motivational Quotes

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

- Nothing is impossible without passion and confidence

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.

- When a seed grows out of pitch darkness, can grow from hard soil, so why not you.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.

- Today's struggle builds tomorrow's strength, Change your mind

 कष्ट करिता भाग्य लाभते, तत्व हे साधे सुधे | 

- कष्ट केल्यानेच मनुष्याला यशाची प्राप्ती होते. हेच यशाचे साधे सोपे असे तत्व आहे.

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः। 

न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः॥


मराठी अर्थ :


कोणतेही कार्य केवळ मनात विचार करून (इच्छा बाळगून) पूर्ण होत नाही, तर त्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात. ज्याप्रमाणे जंगलाचा राजा असलेल्या सिंहालाही आपले पोट भरण्यासाठी शिकार करावीच लागते, झोपलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी स्वतःहून प्रवेश करत नाहीत 

- उद्यमेन

शिक्षण म्हणजे माणसामध्ये आधीपासूनच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण होय. - स्वामी विवेकानंद

- शिक्षणाचे सामर्थ्य

काल करै सो आज कर, आज करै सो अब।
पल में परलै होइगी, बहुरि करैगो कब? 

-  संत कबीर

- वेळेचे महत्व

शिक्षणातून सर्जनशीलता मिळते, सर्जनशीलतेतून विचारप्रक्रिया सुरू होते, विचारांतून ज्ञान प्राप्त होते आणि ज्ञानामुळे तुम्ही महान बनता.

- A.P.J. अब्दुल कलाम

- माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे शिक्षण विषयक विचार

'विद्या ददाति विनयं विनयाद् याति पात्रताम्।
पात्रत्वात् धनमाप्नोति धनात् धर्मं ततः सुखम्।।'


मराठी अर्थ:

विद्येमुळे माणसाला नम्रता प्राप्त होते, नम्रतेमुळे योग्यता प्राप्त होते, योग्यतेमुळे धनाची प्राप्ती होते, धनातून धर्म साध्य करता येतो आणि या सर्वांतून शेवटी माणसाला सुखाची प्राप्ती होते.

- विद्येचे महत्त्व: संस्कृत श्लोक

रूपयौवनसंपन्ना विशालकुलसंभवाः |

विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धा इव किंशुकाः ||


मराठी अर्थ:


जरी तुम्ही रूपवान, तरुण आणि मोठ्या कुळात जन्म घेतला असला तरी, जर तुमच्याकडे 'विद्या' अर्थात ज्ञान नसेल, तर तो माणूस ज्याला वास नसतो अशा पळसाच्या फुलासारखा शोभून दिसत नाही.

- विद्येचे महत्त्व