About Us

                        Mycurrentaffairs.com बद्दल थोडक्यात

आजचे युग हे स्पर्धेचे युग मानले जाते. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी आज अटीतटीच्या स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. यशस्वी होण्यासाठी सुरु असलेल्या या मार्गात स्पर्धा ही अनिवार्य आणि अविभाज्य घटक बनली आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी आजची पिढी या स्पर्धेच्या चक्रव्यूहात अडकली आहे. निश्चित ध्येय आखणी, योग्य मार्गदर्शन, उचित दिशेने मार्गक्रमण या आणि यांसारख्या अनेक बाबींमध्ये जाणवणारी उणीव त्यांच्या अधिकारी पदाच्या प्रवासात मोठा अडथळा बनून राहिली आहे. अशा असंख्य होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या प्रामाणिक हेतूने आम्ही, 'MyCurrentAffairs.com' ने हा उपक्रम सुरू केला आहे. बाजारात उपलब्ध संदर्भ साहित्यामधून निवडक आणि वेचक साहित्याचा अभ्यास आणि मुख्यतः सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अजूनही याबाबतीत विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रम आहे. अशा विद्यार्थ्यांना आमच्या या उपक्रमाद्वारे योग्य वाटचाल करण्यासाठी दिशा मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

सध्या आम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्वाचा असणारा आणि दिवसेंदिवस अत्याधिक आवश्यक बनत जाणारा असा 'चालू घडामोडी' हा विभाग केंद्रित करत आहोत. १ ऑगस्ट २०२० पासून सुरु करण्यात आलेलेल्या या विभागात आम्ही 'दैनंदिन मराठी चालू घडामोडी, दैनंदिन मराठी चालू घडामोडी क्विझ, दर आठवड्याला विशेष प्रश्नांचा समावेश असणारी १ विशेष क्विझ' आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 'दर महिन्याच्या ५ तारखेला मागील महिन्याचे 'चालू घडामोडी मासिक' PDF स्वरूपात मोफत डाऊनलोडींग' करिता उपलब्ध करून देत आहोत. हा सर्व खटाटोप करण्यामागे प्रामाणिक हेतू हाच आहे की पूर्ण विश्लेषण करून आमच्या परीने शक्य तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात.

एक वाचक व जिज्ञासू अभ्यासक या नात्याने तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळावा हीच प्रांजळ अपेक्षा आहे. तुमचा मिळणारा प्रतिसाद आमच्या कामाचा जोम द्विगुणित करण्यास उपयुक्त ठरेल. एक सजग आणि जागरूक स्पर्धा परीक्षा अभ्यासक तसेच कर्तव्यनिष्ठ भावी अधिकारी या नात्याने तुमचेही हे कर्तव्य बनते की आमच्या या उपक्रमाला तुम्ही तुमच्या संपर्कातील होतकरू, अभ्यासू तसेच खाजगी क्लासेस/शिकवण्या न लावू शकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे. जेणेकरून तळागाळातील सामान्य लोकदेखील या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

तुमचा मिळणारा उदंड प्रतिसाद आम्हाला आमच्या भविष्यातील योजना आखण्यास आणि तुमच्यासाठी उत्तमोत्तम अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यास प्रेरणा देण्याचे कार्य करेल याची खात्री आहे. आमचा हा उपक्रम स्पर्धा परीक्षा अभ्यासकांना त्यांच्या अभ्यासात बऱ्याच अनुषंगाने उपयोगी ठरावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आजच्या धडपडणाऱ्या तरुणाईला त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास आमचा हा प्रयत्न खारीचा वाटा जरी ठरला तरी ती आमच्यासाठी आमच्या कामाची पोचपावतीच ठरेल.

या उपक्रमात सहभागी झालेल्या व भविष्यात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यासकांना त्यांच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

                                                                        

                                                                                                       - टीम MyCurrentAffairs.com