-
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index) टेस्ला (Tesla) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे इलोन मस्क हे अॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
ठळक मुद्दे
-
इलोन मस्क यांची एकूण संपत्ती जवळपास १८८.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
-
टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा फायदा मस्क यांना झाला आहे.
-
शेअर्समध्ये झालेल्या २ टक्क्यांहून कमी वाढीमुळे अॅमेझॉनच्या बेझोस यांची संपत्ती जवळपास १८७ अब्ज डॉलर्स इतकी झाल्याने ते दुसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत.
-
ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार बिल गेट्स हे १३२ अब्ज डॉलर्स संपत्तीसह तिसर्या स्थानावर विराजमान झाले आहेत.