-
शाश्वत विकास ध्येयांसाठीच्या (Sustainable Development Goals - SDGs) २०२० सालच्या युवा वर्गवारीमध्ये भारतीय युवक उदित सिंघलचे नाव १७ युवा नेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना चालना देणाऱ्या तरुण नेत्यांच्या यादीमध्ये उदित सिंघलचे नाव समाविष्ट झाले आहे.
-
उदित सिंघल हे दिल्लीतील काच कचर्याच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी शून्य-कचरा (zero-waste) पर्यावरण प्रणालीवर आधारित असणाऱ्या 'ग्लास २ सँडचे (Glass2Sand)' संस्थापक आहेत.
संयुक्त राष्ट्रांबाबत (UN) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यता प्राप्त देश: सध्या संयुक्त राष्ट्रांमध्ये १९३ सदस्य देश तर २ निरीक्षक देश आहेत.