• भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणारा देशाचा ६ वा तसेच तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

ठळक मुद्दे

  • ३२ वर्षीय इशांत शर्माने ९८ सामन्यांमध्ये हा मैलाचा दगड गाठला आहे.

  • इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी डॅन लॉरेन्सला बाद करत इशांतने हा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

  • अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), रविचंद्रन अश्विन (३७७) आणि झहीर खान (३११) हे ३०० बळींचा टप्पा पार करणारे अन्य भारतीय गोलंदाज आहेत.