-
हरिद्वारची १९ वर्षीय विद्यार्थीनी सृष्टी गोस्वामी ही 'राष्ट्रीय बालिका दिनाच्या (National Girl Child Day)' दिवशी एक दिवसासाठी उत्तराखंड राज्याची मुख्यमंत्री बनली होती.
ठळक मुद्दे
-
सृष्टी ही बीएससी कृषीविद्या (BSc Agriculture) शाखेची विद्यार्थीनी आहे.
-
सदर निर्णयाला राज्याचे मुख्यमंत्री श्री. त्रिवेंद्रसिंग रावत यांची मान्यता मिळाली आहे.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.