• प्रतिष्ठित टाईम मासिकामार्फत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांची 'पर्सन ऑफ द इयर (Person of the Year)’ २०२१ म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१ मध्ये मस्क जवळपास २५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या प्रचंड संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

  • एलोन मस्क हे रॉकेट कंपनी SpaceX चे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन तसेच उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची टाईम मासिकामार्फत २०२० साठी 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून निवड करण्यात आली होती.