सोफी ॲडेनोट या अंतराळात चालणाऱ्या पहिल्या फ्रेंच महिला ठरल्या आहेत.

ठळक मुद्दे:

  • युरोपियन अंतराळ संस्थेच्या (European Space Agency - ESA) फ्रेंच अंतराळवीर सोफी ॲडेनोट अंतराळात चालणाऱ्या पहिल्या फ्रेंच महिला ठरल्या आहेत.
  • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (International Space Station - ISS) दळणवळण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी एक मोहीम पार पाडतानाच त्यांनी हा मान मिळविला आहे.
  • इटलीच्या सामंथा क्रिस्टोफोरेटी यांच्या २०२२ सालच्या कामगिरीनंतर अंतराळात चालणाऱ्या त्या दुसऱ्या युरोपियन महिला ठरल्या आहेत.