भारतीय वंशाच्या लक्ष्मणन मेय्यप्पन यांना वयाच्या १६ व्या वर्षी जगातील सर्वात तरुण पुरुष सीए (Chartered Accountant  - CA) बनण्याचा मान मिळाला आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय वंशाचे वित्त क्षेत्रातील व्यावसायिक मेय्यप्पन हे सध्या दुबई (संयुक्त अरब अमिराती - UAE) येथे वास्तव्यास आहेत.
  • लक्ष्मणन मेय्यप्पन यांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'ने जगातील सर्वात तरुण पुरुष 'चार्टर्ड अकाउंटंट' (CA) म्हणून मान्यता दिली आहे.
  • त्यांनी जून २०२१ मध्ये वयाच्या १६ वर्षे आणि १४१ दिवस इतक्या कमी वयात ही कामगिरी साध्य केली होती.

लक्ष्मणन मेय्यप्पन यांच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • मेय्यप्पन यांनी वयाच्या १५ व्या वर्षी 'असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स' (ACCA) या अभ्यासक्रमास सुरुवात करून अवघ्या १ वर्षात तो पूर्ण करून ही पात्रता मिळवली.
  • यानंतर २०२५ मध्ये त्यांनी 'चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट' (CFA) ही पदवी प्राप्त केली.
  • मेय्यप्पन सध्या 'अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ शारजाह'मधून वित्त (Finance) विषयातील 'मास्टर ऑफ सायन्स' (MSc) हे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.