• कोविड - १९ साथीच्या रोगाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत ‘युवा शक्ती कोरोना मुक्ती अभियानाचे (Yuva Shakti Corona Mukti Abhiyan)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'युवा शक्ती अभियानाच्या सहाय्याने कोरोना मुक्ती' हे सदर अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • सदर मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षक तसेच सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांना कोविड - १९ बद्दल योग्य वागणूक व लसीकरणाची शिकवण देत जागरूक करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.