-
राजस्थानमध्ये भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव ‘युध्द अभ्यास (Yudh Abhyas) २०' नुकताच सुरु झाला आहे.
ठळक मुद्दे
-
दोन्ही सैन्याच्या वार्षिक द्विपक्षीय संयुक्त अभ्यासाची ही १६ वी आवृत्ती आहे.
-
सदर अभ्यास या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहील.
-
संयुक्त अभ्यासाची मागील आवृत्ती अमेरिकेतील सिएटल येथे आयोजित करण्यात आली होती.
-
या सरावाच्या माध्यमातून भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील लष्करी संबंधातील सकारात्मक वाढ प्रदर्शित होते.