• भारतीय बहुराष्ट्रीय दुचाकी आणि ३ चाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ही जगातील सर्वात मौल्यवान दुचाकी कंपनी बनली आहे.

ठळक मुद्दे

  • सध्या बजाज ऑटोचे बाजार भांडवल १ लाख कोटीपेक्षा जास्त झाले आहे.

  • बजाज ऑटो ही दुचाकी वाहन उत्पादनातील सर्वात मौल्यवान कंपनीच नव्हे तर इतके बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली दुचाकी वाहन कंपनीही बनली आहे.

बजाज ऑटोबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: पुणे येथे बजाज ऑटोच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली बजाज ऑटोची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष: राहुल बजाज हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक: राजीव बजाज हे सध्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.