-
गतिशीलता मंच म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या 'ओला (Ola)' कंपनीमार्फत तमिळनाडू राज्य सरकारसोबत राज्यात पहिला आणि जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तमिळनाडूतील ओला फॅक्टरी हे जगातील सर्वात मोठी स्कूटर उत्पादन करणारी फॅक्टरी ठरेल अशी अपेक्षा आहे.
-
या कारखान्याची निर्मिती ही पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतच्या संकल्पनेवर आधारित असून याच्या माध्यमातून भारताला दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवर भारताचे अवलंबित्व कमी करणे, स्थानिक उत्पादन वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि देशातील तांत्रिक कौशल्य सुधारणे या बहुआयामी दृष्टीकोनातून या फॅक्टरीची स्थापना करण्यात येत आहे.
तमिळनाडू राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: एडप्पडी के. पलनीस्वामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानी: चेन्नई ही तमिळनाडू राज्याची राजधानी आहे.
-
स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी तमिळनाडू राज्याची स्थापना झाली होती.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडू देशात १० व्या क्रमांकावर आहे.