• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात ३०००० मेगावॅट क्षमतेच्या हायब्रीड नवीकरणयोग्य ऊर्जा पार्कचे (Hybrid Renewable Energy Park)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पार्क हे जगातील हे सर्वात मोठे नवीकरणयोग्य ऊर्जा पार्क असेल.

  • २०३० पर्यंत ४५० GW वीज निर्मितीचे भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका ठरणार आहे.

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.