-
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited - HAL) देशाच्या लष्कराची क्षमता बळकट करण्यासाठी एक स्टार्ट-अप कंपनीसह जगातील पहिला जास्त उंचीवरील आभासी उपग्रह विकसित करणार आहे.
ठळक मुद्दे
-
ठराविक हद्दीतच मानवचलित विमाने कार्य करतील अशा स्वरूपाचा जगातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
-
मानव रहित विमाने शत्रूच्या झोनमध्ये प्रवेश करून त्या प्रदेशात हल्ले करू शकतील अशी अपेक्षा आहे.
HAL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HAL म्हणजेच Hindustan Aeronautics Limited अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड होय.
-
स्थापना वर्ष: १९४० साली HAL ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बेंगळुरू येथे HAL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: आर. माधवन हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.