• चीनमार्फत नुकतेच जगातील पहिल्या ६ G प्रायोगिक उपग्रहाचे (६ G experiment satellite) अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ६ जी उपग्रह हा कक्षांमध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलेल्या ३ चीनी उपग्रहांमध्ये समाविष्ट आहे.

  • अर्जेंटिना कंपनी सॅटेलॉजिकमार्फत विकसित करण्यात आलेल्या १० व्यावसायिक सुदूर संवेदन (Remote Sensing) उपग्रहांचादेखील यात समावेश होता.

  • सदर उपग्रहाचे तंत्रज्ञान ५ जीपेक्षा १०० पट जास्त वेगाने अपेक्षित आहे.

  • पीक आपत्ती निवारण आणि जंगल अग्निशामक प्रतिबंधासाठी वापरण्यात येईल असे तंत्रज्ञान सदर उपग्रहामध्ये आहे.