-
अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे नामकरण 'नरेंद्र मोदी स्टेडियम' असे करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नव्याने सुधारित मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
-
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून नावारूपास आलेल्या या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत आहे.
-
सदर स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
स्टेडियमबाबत महत्वपूर्ण माहिती
-
१९८० च्या सुरूवातीच्या काळात हे स्टेडियम पहिल्यांदा उघडण्यात आले होते.
-
सध्या त्याची आसन क्षमता १,१०,००० इतकी आहे.
-
प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने विचार करता सध्या मोटेरा हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे.