-
जगातील पहिल्या उपग्रह-आधारित अरुंद बँड - इंटरनेट ऑफ थिंग्ज नेटवर्कचे (Narrow Band-Internet of Things - NB-IoT) नुकतेच BSNL मार्फत अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
भारत संचार निगम लिमिटेडतर्फे (BSNL) सदर नेटवर्कसाठी स्कायलोटेक इंडिया (Skylotech India - Skylo) या ग्लोबल मशीन कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स कंपनीसोबत भागीदारी करण्यात आली आहे.
-
IoT सोल्यूशन स्कायलोमार्फत सदरचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून BSNLच्या उपग्रह-भू-पायाभूत सुविधांशी याची जोडणी करण्यात येणार आहे.
-
हा नवीन उपाय सुरवातीला मच्छीमार, शेतकरी, बांधकाम, खाणकाम तसेच लॉजिस्टिक्स उद्योगांना प्रदान करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
BSNL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BSNL म्हणजेच Bharat Sanchar Nigam Limited अर्थात भारत संचार निगम लिमिटेड होय.
-
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: प्रवीण कुमार पुरवार हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BSNL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २००० साली BSNL ची स्थापना करण्यात आली होती.