• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद (World Sustainable Development Summit) २०२१' चे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ‘आपल्या सामान्य भविष्याची पुनर्परिभाषा: सर्वांसाठी निर्धोक आणि सुरक्षित पर्यावरण (Redefining our common future: Safe and secure environment for all)’ ही सदर शिखर परिषदेची थीम आहे.

  • जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद २०२१ ही ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (The Energy and Resources Institute - TERI)’ द्वारे आयोजित फ्लॅगशिप कार्यक्रमाची २० वी आवृत्ती आहे.

  • सदर शिखर परिषद हवामान बदलाच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकार,व्यावसायिक, विदयार्थी, हवामान शास्त्रज्ञ, तरुण वर्ग तसेच नागरी समाज यांना एकत्र आणेल अशी अपेक्षा आहे.