• दिग्गज भारतीय खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज यांना 'जागतिक अ‍ॅथलेटिक्समार्फत (World Athletics)' नुकताच 'वुमन ऑफ द इयर पुरस्कार (Woman of the Year Award)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • देशातील प्रतिभेला जोपासण्यासाठी तसेच लैंगिक समानतेच्या समर्थनासाठी सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • २००३ सालच्या आवृत्तीत जागतिक चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीत कांस्यपदक जिंकणारी ती एकमेव भारतीय आहे.

  • २००५ सालच्या IAAF 'जागतिक अ‍ॅथलेटिक्स फायनल्समध्ये' तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.

  • २०१३ सालच्या पॅरिसमधील 'जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत' लांब उडीत कांस्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनली होती.

पुरस्कार प्राप्त

  • २००२: अर्जुन पुरस्कार

  • २००४: पद्मश्री पुरस्कार

  • २००३: खेलरत्न पुरस्कार

  • २०२१: बीबीसी जीवनगौरव पुरस्कार (सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलीट श्रेणी)