• जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO) युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांची जागतिक आरोग्य वित्त पुरवठ्यासाठी WHO राजदूत म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • २००९ च्या लंडन जी-२० शिखर परिषदेच्या कारभाराद्वारे दुसरी महामंदी रोखण्याचे श्रेय त्यांना मोठ्या प्रमाणावर दिले जाते.

WHO बाबत महत्वपूर्ण माहिती 

  • अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.

  • महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.