• संपूर्ण आरोग्य, स्वकाळजी आणि ग्राहक कल्याण या उद्देशाने ‘येस बँक वेलनेस (YES BANK Wellness)’ आणि ‘येस बँक वेलनेस प्लस (YES BANK Wellness Plus)’ क्रेडिट कार्ड्सचे अनावरण करण्यासाठी येस बॅंकेमार्फत आदित्य बिर्ला वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत (Aditya Birla Wellness Private Limited) भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • स्वत:ची काळजी, मानसिक आणि शारीरिक कल्याण या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट असल्याचे स्पष्ट होते.

येस बँकेबाबत (Yes Bank) महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २००४ साली येस बँकेची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे येस बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: सुनिल मेहता हे सध्या बॅंकचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: प्रशांत कुमार हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • संस्थापक: राणा कपूर आणि अशोक कपूर हे बँकेचे संस्थापक आहेत.