• जागतिक आर्थिक मंचातर्फे (World Economic Forum) जाहीर करण्यात आलेल्या लिंग अंतर निर्देशांक (Gender Gap Index) २०२१ मध्ये भारत १५६ देशांच्या यादीमध्ये १४० व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२० मध्ये भारत १५३ देशांमध्ये ११२ व्या स्थानावर विराजमान होता.

  • सदर अहवालात अफगाणिस्तान हा सर्वात वाईट कामगिरी करणारा देश ठरला आहे.

क्रमवारीतील अव्वल ५ लिंग-समान देश

  • आईसलँड

  • फिनलँड

  • नॉर्वे

  • न्युझीलँड

  • रवांडा

WEF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: WEF म्हणजेच World Economic Forum अर्थात जागतिक आर्थिक मंच होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: कोलोनी, स्वित्झर्लंड हे WEF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थापक: क्लाऊस स्वाब हे WEF चे संस्थापक आहेत.

  • स्थापना वर्ष: जानेवारी १९७१ मध्ये WEF ची स्थापना करण्यात आली होती.