• रशियन फेडरेशनच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स सांस्कृतिक मंत्र्यांची ५ वी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. प्रल्हादसिंग पटेल यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

ठळक मुद्दे

  • बैठकीतील सहभागी मंत्र्यांकडून ब्रिक्स देशांतील सांस्कृतिक क्षेत्रावरील साथीच्या आजाराचा परामर्श जाणून घेण्यात आला.

  • ब्रिक्स देशांदरम्यान संयुक्त सांस्कृतिक ऑनलाईन प्रकल्पांच्या संभाव्य अंमलबजावणीचा आढावादेखील घेण्यात आला.

'ब्रिक्स'विषयी महत्वपूर्ण माहिती

  • विशेषता: ब्रिक्स (BRICS) Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांची मिळून असणारी संघटना आहे. ब्रिक नावाने सुरुवातीला ४ देशांचे गटबंधन झाले होते. २०१० साली दक्षिण आफ्रिका सामील होऊन ब्रिक्स (BRICS) असे नाव प्रचलित झाले.

  • स्थापना वर्ष: २००९ साली ब्रिक्स (BRICS) ची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: आर्थिक, राजकीय आणि प्रादेशिक सहकारी संस्था या स्वरूपाने ही संस्था सध्या कार्यरत आहे.

  • कार्यालयीन भाषा वापर: पोर्तुगीज, रशियन, हिंदी, चीनी आणि इंग्रजी या भाषांचा वापर करण्यात येतो.