-
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘विद्यार्थी विज्ञान मंथन २०२०-२१’ या राष्ट्रीय कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे. बहुआयामी उद्देशांनी युक्त सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे क्रमप्राप्त आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम असून तो सहावी ते अकरावीच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी लोकप्रियता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
-
विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुण ओळखण्यासाठी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक बुद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
-
विद्यार्थी विज्ञान मंथन (Vidyarthi Vigyan Manthan - VVM) हा विज्ञान भारती (Vijnana Bharati - VIBHA) आणि विज्ञान प्रसार यांचा एक स्तुत्य उपक्रम आहे.
-
विद्यार्थ्यांच्या समुदायामधील वैज्ञानिक दृष्टीने उज्ज्वल असणारी मने ओळखण्यासाठी या कार्यक्रमाची संकल्पना चिन्हांकित करून आखली गेली आहे.