• उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांच्यामार्फत कोविड - १९ मुळे आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांसाठी 'मुख्यमंत्री वात्सल्य योजना' जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजनेंतर्गत राज्य सरकार २१ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांच्या देखभाल, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रशिक्षणांची व्यवस्था करेल अशी अपेक्षा आहे.

  • राज्यातील अशा अनाथ मुलांना दरमहा ३००० रुपये देखभाल भत्ता देण्यात येईल.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: तीरथसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.