-
भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून २ ऑक्टोबर २०२० रोजी वैश्विक भारतीय वैज्ञानिक (Vaishwik Bharatiya Vaigyanik - VAIBHAV) शिखर परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
सदर शिखर परिषद ही महिनाभराच्या कालावधीसाठी चालणारी आहे.
-
उदयोन्मुख आव्हाने सोडविण्यासाठी जागतिक स्तरावरील भारतीय संशोधकांचे कौशल्य आणि ज्ञान मिळवणे, जागतिक स्तरावरुन देशामध्ये ज्ञान आणि नाविन्यपूर्ण परिसंस्था तयार करणे या मुख्य उद्देशांसाठी सदर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
-
वैभव परिषद ही सर्व अनुसंधान-तंत्रज्ञान आणि शैक्षणिक संस्था (संशोधन, शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या) यांचा एकत्रित स्वरूपाचा पुढाकार आहे
-
या सर्व बाबींच्या योगे विचार-प्रक्रिया, पद्धती, अनुसंधान आणि विकास संस्कृती या विषयांवर उपाययोजना करता येईल अशी अपेक्षा आहे.