• उत्तराखंडमधील रानीखेत येथे भारतातील पहिल्या वन चिकित्सा केंद्राचे (Forest Healing Centre) नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • उत्तराखंड वनविभागामार्फत जंगल उपचार गुणधर्मांवरील संशोधनानंतर सदर वन उपचार केंद्र विकसित करण्यात आले आहे.

  •  सदर केंद्र सुमारे १३ एकर क्षेत्रात विस्तारले आहे.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.