-
आसन कन्झर्वेशन रिझर्व (Asan Conservation Reserve) हे उत्तराखंडमधील पहिले रामसर क्षेत्र बनले आहे.
ठळक मुद्दे
-
‘आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ क्षेत्र (Wetland of International Importance)’ म्हणून पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत याची घोषणा करण्यात आली आहे.
-
हिमालय राज्यात यमुना नदीच्या काठावर सदर पाणथळ क्षेत्र स्थित आहे.
-
रामसर क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्यासाठी आवश्यक ९ पैकी ५ निकष आसन कॉन्झर्वेशन रिझर्वने पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाण्यास पात्र ठरले आहे.
-
दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसर ठिकाणे भारतात असून त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
-
उत्तराखंडला पहिलेवहिले रामसर क्षेत्र प्राप्त झाले आहे.
पाणथळ क्षेत्रांविषयी रामसर कराराबाबत (Ramsar Convention on Wetlands) महत्वपूर्ण माहिती
-
कराराचा प्रकार: पाणथळ क्षेत्रांवर आधारित रामसर हा आंतरराज्यीय करार आहे.
-
करार स्वीकार वर्ष: २ फेब्रुवारी १९७१ रोजी कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील इराणी शहर रामसार येथे या कराराचा स्वीकार करण्यात आला होता.