-
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे सुमारे ४ एकर क्षेत्रावर फुलपाखरे, मधमाशा, पक्षी तसेच कीटकांच्या ४० विविध प्रजातींचा देशातील पहिला परागकण पार्क (Pollinator Park) विकसित करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
परागकण प्रजातींचे संवर्धन करणे, सदर प्रजातींच्या संवर्धनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच परागणांच्या विविध पैलूंवर पुढील संशोधनास प्रोत्साहन देणे हा पार्क विकसित करण्यामागील मुख्य उद्देश आहे.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.