-
उत्तर प्रदेशच्या आग्रामधील किथम तलाव जो सुर सरोवर म्हणून ओळखला जातो त्याला रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सुर सरोवर हे १०६ हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांच्या विश्रांतीचे स्थान आहे.
पाणथळ क्षेत्रांविषयी रामसर कराराबाबत (Ramsar Convention on Wetlands) महत्वपूर्ण माहिती
-
कराराचा प्रकार: पाणथळ क्षेत्रांवर आधारित रामसर हा आंतरराज्यीय करार आहे.
-
करार स्वीकार वर्ष: २ फेब्रुवारी १९७१ रोजी कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील इराणी शहर रामसार येथे या कराराचा स्वीकार करण्यात आला होता.
उत्तर प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: योगी आदित्य नाथ हे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: आनंदीबेन पटेल या सध्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर प्रदेश राज्याचा देशात चौथा क्रमांक लागतो.