-
जोसेफ रॉबिनेट बायडन जूनियर यांनी मावळते अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष बनण्याचा बहुमान मिळवला आहे.
ठळक मुद्दे
-
व्हाईट हाऊस जिंकण्यासाठी आवश्यक २७० मतांना मागे टाकत त्यांनी एकूण २९० मते मिळवली.
-
कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असणाऱ्या कमला हॅरिस अमेरिकन उपाध्यक्ष पदावर आपली दावेदारी सिद्ध करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय आणि भारतीय-अमेरिकन महिला ठरल्या आहेत.
जो बायडन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
बायडन यांचा जन्म १९४२ साली पेनसिल्व्हेनिया मध्ये झाला होता.
-
डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बायडन यांनी यापूर्वी २००९ ते २०१७ या काळात ४७ व्या उपराष्ट्रपती पदाची धुरा सांभाळली होती.
कमला हॅरिस यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
हॅरिस यांचा जन्म १९६४ साली कॅलिफोर्नियामध्ये झाला होता.
-
२०१७ पासून त्यांनी कॅलिफोर्नियामधील ज्युनियर अमेरिकन सिनेटर म्हणून काम पाहिले आहे.