-
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (Bharat Petroleum Corporation Ltd - BPCL) नुकतेच 'URJA' नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम चॅटबॉटचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आपल्या ग्राहकांना अखंड स्व-सेवेचा अनुभव प्रदान करणे तसेच समस्यांचे जलद निराकरण करणे या मुख्य उद्देशांसाठी व्यासपीठ प्रदान करण्यासाठी ही सेवा निर्माण करण्यात आली आहे.
-
URJA हा भारतातील तेल आणि वायू उद्योगातील पहिला चॅटबॉट आहे.
BPCL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BPCL म्हणजेच 'Bharat Petroleum Corporation Ltd' अर्थात 'भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BPCL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक: के. पद्माकर हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.