-
ऑगस्ट २०२१ महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (United Nations Security Council - UNSC) अध्यक्षपद भारताकडे सुपूर्त करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर अध्यक्षपदाचा कार्यभार भारताने फ्रान्सकडून स्वीकारला आहे.
-
UNSC चा अस्थायी सदस्य म्हणून २०२१-२२ च्या कार्यकाळात भारताचे हे पहिले अध्यक्षपद आहे.
-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे UNSC च्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.
UNSC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UNSC म्हणजेच 'United Nations Security Council' अर्थात 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद' होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे UNSC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UNSC ची स्थापना करण्यात आली होती.
-
सदस्य देश: सध्या UNSC चे १५ सदस्य देश आहेत.