-
'स्वच्छ भारत क्रांती' हे पुस्तक स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission - SBM) बाबतच्या विविध निबंधांद्वारे आणि विविध सहयोगींच्या श्रेणीद्वारे ३५ निबंधांच्या माध्यमातून प्रवास व्यक्त करते. केंद्रीय स्वच्छ जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या हस्ते 'स्वच्छ भारत क्रांती' या पुस्तकाचे औपचारिक अनावरण नवी दिल्लीत करण्यात आले.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाचे संपादन पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव श्री.परमेश्वरन अय्यर यांनी केले आहे.
-
सामाजिक क्रांतीबद्दल स्वच्छ भारत मिशनविषयी त्यांचा दृष्टीकोन पुस्तकात व्यक्त करण्यात आला आहे.
-
स्वच्छ भारत क्रांती पुस्तकातील निबंध चार मुख्य विभागांमध्ये मांडण्यात आले आहेत जे स्वच्छ भारत मिशनच्या यशाचे चार मुख्य स्तंभ आहेत. ते म्हणजे राजकीय नेतृत्व, सार्वजनिक वित्तपुरवठा, भागीदारी आणि लोक सहभाग होय.