• युनेस्कोमार्फत सिंगापूरमधील स्ट्रीट फूडच्या 'हॉकर (Hawker)' संस्कृतीचा आपल्या प्रतिष्ठीत ‘मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा प्रतिनिधींच्या यादीमध्ये (Representative List of the Intangible Cultural Heritage of Humanity)' समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • 'हॉकर' संस्कृती ही सिंगापूरमधील पाककला पद्धतीची एक लोकप्रिय शैली म्हणून प्रसिद्ध आहे.

  • नैसर्गिकरित्या हवेशीर परिसरामध्ये या पद्धतीची हॉकर केंद्रे उपलब्ध आहेत ज्यामध्ये विविध संस्कृतींच्या खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येते.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे UNESCO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचे प्रमुख: ऑड्रे अझोले हे सध्या UNESCO च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १९४५ साली UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.