-
एक जटील बहुआयामी परिस्थितीत लढाऊ तत्परतेची चाचणी घेण्यासाठी भारतीय नौदलामार्फत हिंद महासागर प्रदेशात 'TROPEX' नावाच्या युद्ध अभ्यासाचा सराव घेण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
जहाजे, पाणबुड्या आणि विमाने यांसारख्या सर्व साधनांचा समावेश सदर अभ्यासात करण्यात आला आहे.
-
सदर ‘थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडीनेस एक्सरसाईज’ (Theatre Level Operational Readiness Exercise - TROPEX)’ हा द्वैवार्षिक स्वरूपाचा आहे.
-
नौदलाची संरक्षण क्षमता तपासणे तसेच हिंद महासागरातील शांतता आणि स्थिरतेला चालना देण्याबरोबरच सागरी क्षेत्रातील राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करणे हे या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.