• केंद्रीय पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री (Union Minister of State for Tourism & Culture) श्री. प्रल्हादसिंग पटेल यांच्यामार्फत केरळमधील गुरुवायूर येथे 'पर्यटक सुविधा केंद्राचे (Tourist Facilitation Centre)' व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद (PRASHAD) योजनेंतर्गत 'गुरूवायूरचा विकास, केरळ' या प्रकल्पांतर्गत ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

  • सदर सुविधेकरिता ११.५७ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.