-
भारतीय ऑलिम्पिक चळवळीचे संचालक मंडळ, भारतीय ऑलिम्पिक संघटना (Indian Olympic Association - IOA) आणि आयनॉक्स (INOX) समूहामार्फत टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठीच्या प्रायोजकतेच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे
-
कोविड-१९ मुळे २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक आयोजित करण्यात येणार आहे.
-
भागीदारी करार आयनॉक्स लीजर लिमिटेड (INOX Leisure Limited) या समुहाच्या करमणूक कंपनीमार्फत भारतीय संघाच्या जाहिरातींना पुढे पाठिंबा देण्यात येईल.
आयनॉक्स समूहाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्वरूप: आयनॉक्स समूह हा एक वैविध्यपूर्ण स्वरूपाचा भारतीय समूह आहे.
-
समाविष्ट उपक्रम: मल्टीप्लेक्स चेन, वैद्यकीय आणि औद्योगिक वायू, क्रायोजेनिक उपकरणे, एलएनजी (LNG) साठवण आणि वितरण उपकरणे तयार करणार्या उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.