• आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत नुकतेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (National Family Health Survey - NFHS) - ५ मधील प्रतिकूल निष्कर्षांचा अभ्यास करण्यासाठी प्रीती पंत पॅनेल गठीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर मंत्रालयामार्फत सहसचिव प्रीती पंत यांच्या नेतृत्वाखाली औषध आणि पोषण तज्ज्ञांची तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे.

इतर महत्वपूर्ण माहिती

  • संबंधित तज्ज्ञ गटामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक इ. राज्यांमधील कार्यक्रम अधिकाऱ्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

  • सदर समिती ही राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण  - ५ च्या निष्कर्षांची तपासणी करून सुधारणा करण्यासाठी धोरणे सुचवेल अशी अपेक्षा आहे.

  • नव्याने गठित गटामार्फत नियमितपणे बैठका घेऊन शिफारसी देणे अपेक्षित आहे.