• पंजाब नॅशनल बँकेमार्फत (Punjab National Bank - PNB) ‘फिनटेक इनोव्हेशन सेंटर (Fintech Innovation Centre - FIC)’ स्थापन करण्यासाठी IIT कानपूर आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नाविन्य आणि संशोधनासाठीच्या संस्थेसोबत (Foundation for Innovation & Research in Science & Technology - FIRST)' भागीदारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (Banking, Financial Services and Insurance - BFSI) इ. बाबतच्या आव्हानांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाच्या उपाययोजनांबाबत PNB आणि IIT कानपूर हे एकत्रितपणे काम करतील अशी अपेक्षा आहे.

PNB बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: PNB म्हणजेच Punjab National Bank अर्थात पंजाब नॅशनल बँक होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे PNB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: एस. एस. मल्लिकार्जुन राव हे या पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १८९४ मध्ये पाकिस्तानमधील लाहोर येथे पंजाब नॅशनल बँकेची स्थापना करण्यात आली होती.

  • बँकेचे संस्थापक: लाला लाजपत राय आणि दयालसिंह मजीठिया हे PNB चे संस्थापक आहेत.