• नीती आयोगामार्फत ग्राहक तसेच विविध उद्योगांसोबत काम करत शून्य-प्रदूषण वितरण वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 'शून्य (Shoonya)' नावाच्या कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'अमेरिका आणि रॉकी माउंटन इन्स्टिट्यूट (Rocky Mountain Institute - RMI)' तसेच RMI इंडिया यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

  • सदर मोहीम शहरी वितरण विभागात इलेक्ट्रिक वाहने घेण्यास प्रोत्साहन देताना त्यांच्या फायद्यांविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.

NITI आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NITI म्हणजेच National Institution for Transforming India अर्थात भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी २०१५ साली नीती आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे नीती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • उपाध्यक्ष: राजीव कुमार हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.