-
आर्थिक समावेशनास (Financial Inclusion) प्रोत्साहन देण्यासाठी फायनान्शियल सॉफ्टवेयर अँड सिस्टीम्स (Financial Software and Systems - FSS) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत (India Post Payments Bank - IPPB) हातमिळवणी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
एकात्मिक देय उत्पादनांचे प्रदाता असलेल्या FSS मार्फत विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य करत तसेच ज्या विभागांमध्ये बँकांची उपलब्धता कमी आहे अशा बाबतीत आर्थिक समावेशनास प्रोत्साहन देण्यासाठी IPPB सोबत भागीदारी करण्यात आली आहे.
IPPB बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IPPB म्हणजेच India Post Payments Bank अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक होय.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: जे. वेंकटरामू हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IPPB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: २०१८ साली IPPB ची स्थापना करण्यात आली होती.