• छतावरील सौर विभागात MSME ग्राहकांना सुलभ आणि परवडणारी वित्तपुरवठा योजना देण्यासाठी टाटा पॉवरमार्फत भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत (Small Industries Development Bank of India - SIDBI) भागीदारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजना MSME ना त्यांच्या व्यवसायाकरिता शाश्वत ऊर्जा वापरण्यास सक्षम करेल अशी अपेशा आहे.

SIDBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SIDBI म्हणजेच Small industrial Development Bank of India अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँक होय.

  • स्थापना वर्ष: SIDBI ची स्थापना २ एप्रिल १९९० रोजी झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: 'भारतातील एक विकास वित्तीय संस्था' या स्वरूपात सध्या SIDBI कार्यरत आहे.

  • मुख्यालयाचे ठिकाण: SIDBI चे मुख्यालय लखनौ, उत्तर प्रदेश येथे आहे.

  • संस्थेचा उद्देश: उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देऊ करणे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करणे हा SIDBI चा मुख्य उद्देश आहे.