• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या हस्ते विजया राजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या स्मृतीनाण्याचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून या स्मृतीनाण्याचे अनावरण केले आहे.

  • भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणाऱ्या राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १०० रुपयांचे स्मारक नाणे जाहीर करण्यात आले आहे.

  • अर्थ मंत्रालयातर्फे या खास नाण्याची मुद्रा तयार करण्यात आली आहे.

  • विजया राजे सिंधिया या 'ग्वाल्हेरच्या राजमाता' म्हणूनही परिचित होत्या.