• सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत (Central Bank of India) ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या’ (National Payments Corporation of India - NPCI) संयुक्त विद्यमाने ‘रुपे सिलेक्ट (RuPay Select)’ या नावाने कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डाचा अनोखा प्रकार सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सेंट्रल बँक रुपे सिलेक्ट डेबिट कार्डधारक गोल्फ कोर्स, व्यायामशाळा, स्पा इ. ठिकाणी सवलत मिळविण्यास याचा वापर करण्यास सक्षम ठरतील.

NPCI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NPCI म्हणजेच National Payments Corporation of India अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया होय.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: दिलीप अस्बे हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे NPCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २००८ साली NPCI ची स्थापना करण्यात आली होती.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: पल्लव महापात्रा हे  पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९११ साली सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती.