-
ओडिशामार्फत नुकताच 'युनायटेड नेशन्स कॅपिटल डेव्हलपमेंट फंडसोबत (United Nations Capital Development Fund - UNCDF)' महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'मिशन शक्ती लिव्हिंग लॅब (Mission Shakti Living Lab)' सुरू करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजनेअंतर्गत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील अशी अपेक्षा आहे.
-
महिलांची स्वायत्तता तसेच आर्थिक स्वातंत्र्याशी संबंधित अडथळे या योजनेमुळे दूर होतील अशी अपेक्षा आहे.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.