-
भारतीय खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक ICICI बँक आणि नियो (Niyo) कंपनीमार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small and Medium Enterprises - MSMEs) कामगारांना प्रीपेड कार्ड देण्यासाठी भागीदारी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
MSMEs ना त्यांच्या ब्ल्यू-कॉलर कामगारांसाठी व्हिसाद्वारे समर्थित ‘ICICI बँक नियो भारत पेरोल कार्ड (ICICI Bank Niyo Bharat Payroll Card)’ मिळवू शकतील.
ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.