• केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री श्री. प्रल्हादसिंग पटेल यांच्या हस्ते मिझोरममध्ये 'थेनजोल गोल्फ रेसॉर्ट' चे ऑनलाइन उद्घाटन संपन्न झाले. सदर प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत राबविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • थेनजोल गोल्फ कोर्स भारतीय लोकांसाठी वाजवी किंमतीत दर्जेदार गोल्फ खेळाच्या सोयी आणि आंतरराष्ट्रीय सुविधा देईल.

  • कॅनडा आधारित गोल्फ कोर्स आर्किटेक्चरल फर्म, ग्रॅहम कूक आणि सहाय्यक यांनी थेनजोल, मिझोरम येथे गोल्फ कोर्सची रचना केली आहे.

  • त्याचे एकूण क्षेत्रफळ १०५ एकर असून खेळ क्षेत्राचे क्षेत्रफळ ७५ एकर आहे.

मिझोरम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: जोरमथंगा हे सध्या मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्यपाल: पी.एस. श्रीधरन पिल्लई हे सध्या मिझोरम राज्याचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळत आहेत.

  • राज्य स्थापना: मिझोरमची केंद्र शासित प्रदेश म्हणून २१ जानेवारी १९७२ रोजी स्थापना झाली. २० फेब्रुवारी १९८७ रोजी त्याला राज्य दर्जा प्राप्त झाला.

  • राजधानी: ऐजवाल ही मिझोरम राज्याची राजधानी आहे.

  • अधिकृत भाषा वापर: मिझो, इंग्रजी आणि हिंदी या भाषांचा अधिकृत भाषा म्हणून वापर करण्यात येतो.