• भारताचे उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ‘भारतातील तरुण मुलांची सद्यस्थिती (The State of Young Child in India)’ नावाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • मोबाईल क्रेच या पॉलिसी अ‍ॅडव्होसी संस्थेमार्फत सदर अहवाल तयार करण्यात आला होता.

  • सदर अहवालाच्या सहाय्याने देशातील आरोग्य आणि पोषण यांचे मोजमाप करण्यात येते.

  • या अहवालानुसार ६ वर्षाखालील १५९ दशलक्ष मुलांपैकी २१ टक्के मुले कुपोषित आहेत.

  • ३६ टक्के कमी वजनाची असून ३८ टक्के मुले पूर्ण लसीकरणाचा लाभ घेत नाहीत अशी एकंदरीत स्थिती आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांची क्रमवारी

  • केरळ

  • गोवा

  • त्रिपुरा

  • तमिळनाडू

  • मिझोरम

निकृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांची क्रमवारी

  • बिहार

  • उत्तर प्रदेश

  • झारखंड

  • मध्य प्रदेश

  • छत्तीसगड